मोताळा तालुक्यात पिके सुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 08:05 PM2017-08-17T20:05:45+5:302017-08-17T20:06:40+5:30

मोताळा : तालुक्यात पावसाअभावी पिके सूकत चालले आहेत.  तालुक्यात पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यातील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाउस नसल्यामुळे पिकं मोठ्या प्रमाणावर सुकत आहेत. यावर्षी समाधान कारक पाउस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र या हवामान खात्याचा अंदाजही चुकीचा ठरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील जयपूर, वरुड, खरबडी, जनुना, कोथळी शिवारातील पावसाअभावी जळालेल्या पिकांची आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी पाहणी केली.

Cultivation of cotton in Motala taluka | मोताळा तालुक्यात पिके सुकली

मोताळा तालुक्यात पिके सुकली

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यातील पिकांना पावसाची नितांत गरजजयपूर, वरुड, खरबडी, जनुना, कोथळी शिवारातील पिके प्रभावितशेतकरी हवालदिल 

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : तालुक्यात पावसाअभावी पिके सूकत चालले आहेत.  तालुक्यात पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यातील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाउस नसल्यामुळे पिकं मोठ्या प्रमाणावर सुकत आहेत. यावर्षी समाधान कारक पाउस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र या हवामान खात्याचा अंदाजही चुकीचा ठरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील जयपूर, वरुड, खरबडी, जनुना, कोथळी शिवारातील पावसाअभावी जळालेल्या पिकांची आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी पाहणी केली.
पाहणी केल्यानतंर संबंधित यंत्रणेला सपुंर्ण तालुक्यातील शेतीचे तातडीने सर्वेक्षण करण्याची व शेतकºयांना तात्काळ मदतसाठी शासनदरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी सबंधीत गावातील शेतकºयांना दिले. पिकांची पाहणी करताना आ.हर्षवर्धन सपकाळ यांच्या सोबत मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल खाकरे, नाना देशमुख, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष इरफान पठाण, विक्रम देशमुख, निलेश जाधव, बाळु नावकर व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Cultivation of cotton in Motala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.