पिकातील कोळपणीही जपते परंपारिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2017 01:44 PM2017-07-07T13:44:33+5:302017-07-07T13:44:33+5:30

पावसानंतर पेरणी केली त्यांचे पीक पहिल्या कोळपणी साठी सज्ज झाली आहेत.

Cultivation of Roots of Traditional Tradition | पिकातील कोळपणीही जपते परंपारिकता

पिकातील कोळपणीही जपते परंपारिकता

Next

तणनाशक फवारणीला फाटा : जमिनीतील ओलाव्यावर पिके जीवंत
बुलडाणा : जिल्ह्यात १५ दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून, सध्या पिके
जमिनीतील ओलाव्यावर तग धरून आहेत. शेतातील पेरणी जरी ट्रॅक्टरच्या
सहाय्याने केली तरी कोळपणी मात्र पारंपरिक पद्धतीनेच करण्यात येत आहे.
यावर्षी शेतकऱ्यांकडे तणनाशकाची फवारणी करण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याने
सध्या पिकांमधील तण नष्ट करण्यासाठी शेतकरी बैलांच्या सहाय्यानेच
कोळपणीची पारंपारिकम पद्धतीने कामे करत आहेत.
जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरवरून राजाने चांगली हजेरी लावली
होती.  त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि काही शेतकरी
पावसाच्या प्रतीक्षेत नभाकडे नजर लावून बसले. ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या
पावसानंतर पेरणी केली त्यांचे पीक पहिल्या कोळपणी साठी सज्ज झाली आहेत.
आपल्या पिकात तन जास्त प्रमाणात विस्तारू नये यासाठी शेतकरी डवऱ्याच्या
साहाय्याने पिकामध्ये कोळपणी करत आहेत. पावसाने उघाडीप दिल्याने काही
शेतकऱ्यांची पेरणी ठप्प झालेली आहे. मात्र मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर
अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यामुळे सध्या शेतात सोयाबीन, मूग, उडीद,
तूर, कपाशी आदी पिके चांगली बहरलेली आहेत. जमिनीत सध्यातरी ओलावा कायम
असल्याने पिकांमध्ये तणाचे प्रमाणही वाढले आहे. पिकातील वाढलेले तण
शेतकऱ्यांकरिता मनस्तापाचे कारण असताना निंदनाच्या खर्चाचा मोठा फटका
शेतकऱ्यांना बसत आहे. मजुरीचे दरच कडाडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
बसत आहे. सुरुवातीला पावसाने हजेरी लावली व लगेच पावसाने दडी मारली.
त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटास सुद्धा सामोरे जावे
लागले.  पावसाची उघडीप असल्याने सध्या पिकांमध्ये करण्यात येत असलेली
कोळपणी पिकांसह पोषक ठरत आहे. त्यामुळे वाढलेले तणही नष्ट करण्यासाठी
फायद्याची ठरत आहे.


शेतकऱ्यांचा यावर्षी कोळपणीवर भर
शेतातील तण नष्ट करण्यासाठी विविध तणनाशक औषधांची फवावरणी करण्यात येते.
मात्र, यावर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्रच बिघडले. त्यामुळे तणनाशकाचा खर्च
शेतकऱ्यांना न परवडणार आहे. शेतात पिकांपेक्षा तण अधिक झाल्याने  व महागडे
तणनाशक यावर्षी शेतकरी वापरू शकत नाहीत. त्यामुळे यावर्षी बैलांच्या
सहाय्याने कोळपणी करण्यावर सर्वाधिक शेतकऱ्यांचा भर आहे.

Web Title: Cultivation of Roots of Traditional Tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.