रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:40 AM2021-03-01T04:40:34+5:302021-03-01T04:40:34+5:30
--२० टक्केच बेड उपलब्ध-- जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ३३५५ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटरसह कोविड समर्पित ...
--२० टक्केच बेड उपलब्ध--
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ३३५५ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटरसह कोविड समर्पित रुग्णालयात ते उपलब्ध आहे. यापैकी ८० टक्के बेड फुल्ल झाले आहेत. अर्थात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अवघे २० टक्केच बेड जिल्ह्यात उपलब्ध आहेत. परिणामस्वरुप कुलूप लावलेले कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खामगाव व बुलडाणा शहरात त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. बुलडाणा कोविड समर्पित रुग्णालयातील ९० टक्के बेड रुग्णांनी व्यापलेले असून येथील क्षमता १०४ बेडची आहे.
--दोन महिन्यात ६,१५० रुग्ण--
नव्या वर्षाच्या दोन महिन्यात जिल्ह्यात ६,१५० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात १२,५१८ इतके कोरोनाचे रुग्ण होते. त्यापैकी निम्मे रुग्ण हे जानेवारी, फेब्रुवारी २०२१ मध्ये आढळून आले आहेत. जवळपास त्याची टक्केवारी ही ४९ टक्के आहे. त्यावरून जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे चित्र आहे.
--दोन महिन्यातील रुग्णांची स्थिती--
एकूण बाधित:- ६१५०
बरे झालेले रुग्ण:- ३,६३६
सक्रिय रुग्ण: २,६९९
दोन महिन्यातील मृत्यू--४२