संचारबंदी कागदावरच, नागरिकांचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:09+5:302021-05-07T04:36:09+5:30
ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य लाेणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये एक-एक महिना नाल्यांची साफसफाई होत नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये घाण साचलेली ...
ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य
लाेणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये एक-एक महिना नाल्यांची साफसफाई होत नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये घाण साचलेली आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या दुर्गंधीयुक्त घाणीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वन विभागाकडून चार लाखांची मदत
बुलडाणा : वन्य प्राण्यांकडून पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते. गत दाेन ते तीन वर्षांत पिकांच्या झालेल्या नुकसानीपाेटी शेतकऱ्यांना १ लाख ५१ हजार, तर पाळीव प्राण्यांच्या झालेल्या हानीप्रकरणी २ लाख ९० हजार रुपयांची भरपाई दिली आहे.
चार गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा
बुलडाणा : जिल्ह्यातील चार गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे पाण्याचे टॅंकर मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये माेताळा तालुक्यातील चिंचखेडनाथ व इसालवाडी तसेच चिखली तालुक्यातील तांबूळवाडी व सैलानी नगर या गावांचा समावेश आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
बुलडाणा : मार्च महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही मदत मिळालेली नाही.
नाेंदणी नसलेल्या कामगारांनाही मदत द्या
बुलडाणा : वाढत्या काेराेना संसर्गाला राेखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नाेंदणीकृत मजुरांना सरकारच्या वतीने मदत देण्यात येत आहे. ही मदत नाेंदणी नसलेल्या कामगारांनाही देण्याची मागणी हाते आहे.
पाट्या बदलून दुकाने झाली अत्यावश्यक
लोणार : कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सरकारने बुधवारी रात्रीपासून लॉकडाऊन लागू केल्यानंतर काही व्यावसायिकांनी नवी शक्कल शोधली आहे. जुन्याच व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचे नवे रूप देऊन दुकाने सुरू ठेवली आहेत.
पीक विम्यापासून शेतकरी वंचित
बुलडाणा : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. आधीच शेतकरी संकटात सापडलेले असताना विम्याची रक्कम मिळाली नसल्याचे चित्र आहे.
राेजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी
डाेणगाव : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. ग्रामीण भागात खरीप हंगाम संपल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. प्रशासनाने राेहयाेतून कामे सुरू करावीत, अशी मागणी हाेत आहे.
पांदण रस्त्याची कामे करण्याची मागणी
देऊळगाव मही : परिसरातील अनेक पांदण रस्त्यांची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पेरणीपूर्वी दुरुस्ती करण्याची गरज आहे.
संचारबंदीतही रेतीची अवैध वाहतूक सुरूच
देऊळगाव राजा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळातही रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. सर्वसामान्यांना संचारबंदी असताना दुसरीकडे रेतीची वाहने दिवसभर वाहतूक करतात.
ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ना आयसोलेशन!
बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना हाेमक्वारंटाईन राहण्याची सूट देण्यात येते. ग्रामीण भागातही अनेक रुग्ण हाेम क्वारंटाईन असले तरी त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने ते गावभर फिरून काेराेनाचा प्रसार करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे.
कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत
सुलतानपूर : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम अद्याप जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.