५२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:33 AM2020-11-04T11:33:03+5:302020-11-04T11:33:11+5:30

Buldhana Gram panchayat Election News मुदत संपलेल्या ५२८ ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांना निवडणुकीची उत्सुकता लागली आहे.

Curiosity for 528 Gram Panchayat elections | ५२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची उत्सुकता

५२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची उत्सुकता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने सहा महिने लाॅकडाउन करण्यात आले हाेते. त्यामुळे जिल्ह्यातील ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर टाकण्यात आल्या असून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून अनलाॅक प्रक्रीया सुरू झाली असून निवडणुका घेण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे, मुदत संपलेल्या ५२८ ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांना निवडणुकीची उत्सुकता लागली आहे.
जिल्ह्यातील 228 ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्टमध्ये, 289 ग्रामपंचायतची सप्टेंब तर पाच ग्रामपंचातयतींची मुदत ऑक्टोबरमध्ये संपली. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये ६ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे, मात्र या निवडणुका घेणे शक्य नसल्याने बेमुदत पुढे ढकलण्यात येऊन तिथे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात विधान परिषद निवडणुक घेण्यास निवडणुक आयाेगाने मंजूरी दिली आहे. तसेच मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीपैकी ५२६ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना २ नाेव्हेंबर राेजी जाहीर करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी 2021 ही अर्हता दिनांकवर आधारित मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. यामुळे जानेवारी 2021 मध्ये 526 सह सरपंचपद रिक्त असलेल्या ग्रामपंचायती मिळून कमीअधिक ७०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाेण्याची शक्यता आहे.

Web Title: Curiosity for 528 Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.