साराेळापीर येथून दाेन मुली बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:04+5:302021-07-10T04:24:04+5:30
पावसाची दांडी; दुबार पेरणीचे संकट देऊळगाव राजा : तालुक्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. शंभर ...
पावसाची दांडी; दुबार पेरणीचे संकट
देऊळगाव राजा : तालुक्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस शेवटच्या आठवड्यात बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणीला सुरुवात केली. मात्र नंतरच्या काळात पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवल्याने बहुतांश भागात पावसाअभावी भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
पावसामुळे अंढेरा परिसरात दिलासा
अंढेरा : मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, मका यासह आदी पिके जागीच जखडून बसले होते. मात्र बुधवारी अंढेरा परिसरात तब्बल पंधरा दिवसांनंतर पावसाच्या सरी बरसल्याने शेतकरी सुखावला आहे. खरिपाच्या पिकाला मोठा आधार मिळाला आहे.
शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज मिळणार
लाेणार : शेतकऱ्यांची हेळसांड होऊ नये, त्यांना वेळेवर पीक कर्ज मिळावे, यासाठी येथील भारतीय स्टेट बॅंकेने शेतकऱ्यांना दहा टक्के वाढीव पीक कर्ज देण्याचा निर्णय घेेतला आहे. एवढेच नव्हे तर बॅंक आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे.
एकास मारहाण; ७ जणांविरुद्ध गुन्हा
मेहकर : शेतात मशागत करताना अडवल्याने मारहाण केल्याची गवंढाळा येथे ७ जुलै बुधवार रोजी घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. पुढील तपास मेहकर पाेलीस करीत आहेत.