मेहकर तालुक्यात दाेघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:28+5:302021-05-03T04:29:28+5:30
अस्वलाच्या वावराने नागरिकांमध्ये भीती बोरीअडगाव : खामगाव ते बुलडाणा मार्गावर बोथा गावाजवळ अस्वलाचा वावर आहे. यापूर्वी अस्वलाने ...
अस्वलाच्या वावराने नागरिकांमध्ये भीती
बोरीअडगाव : खामगाव ते बुलडाणा मार्गावर बोथा गावाजवळ अस्वलाचा वावर आहे. यापूर्वी अस्वलाने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे बोथा गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ऑनलाइन खरेदीत फसवणूक
मलकापूर : ऑनलाइन खरेदीचे लोन सध्या ग्रामीण भागातही पसरत असून, तेथील तरुणांनाही ऑनलाइन खरेदीचे आकर्षण असून, शहरातील नातेवाइकांचे पत्ते देऊन या पत्त्यावर खरेदी साहित्य प्राप्त केले जात आहे.
मेहकरात ७५ पाॅझिटिव्ह
मेहकर : शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून, रविवारी ७५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच हिवरा आश्रम ७, डोणगांव १०, उमरा देशमुख ८, कल्याणा ९, जानेफळ ३, नांद्रा धांडे ६, सावंगी माळी ५, अंत्री देशमुख येथील पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
बुलडाण्यात १४९ पाॅझिटिव्ह
बुलडाणा : शहरासह ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरूच असून, रविवारी शहरातील १४९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच दुधा येथील ४, सुंदरखेड १, जामठी २, भादोला ४, पांगरी येथील दाेघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
विहिरींमधील पाणी गढूळ
जवळा : गावात असलेल्या विहिरींमध्ये घाण साचल्यामुळे पाणी गढूळ झाले आहे. या विहिरीतील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे आजार बळावण्याची शक्यता आहे. विहिरींमध्ये ब्लिंचिंग पावडर टाकण्याची मागणी होत आहे.
शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची मागणी
शेगाव : पंचायत समितीअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. या समस्या सोडवाव्या, अशी मागणी शिक्षक सेनेच्या वतीने बुधवारी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
ऑटो चालकांवर कर्जाचा डोंगर
संग्रामपूर : लॉकडाऊनमुळे ऑटोचालक त्रस्त झाले आहेत. गत एक वर्षापासून त्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ऑटो खरेदी करण्याकरिता अनेकांचे कर्ज घेतले आहे. प्रवासी नसल्याने कर्जाचा डोंगर वाढतच आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज
जळगाव जामोद : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोना महामारीच्या संकटाशी लढण्यास पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती जळगाव जामोद शहर पोलिस स्टेशनचे शणेदार सुनील जाधव यांनी दिली आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त
नांदुरा : गेल्या अनेक महिन्यांपासून नांदुरा-मोताळा रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पाणी मारण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.