दलितवस्ती निधीच्या कामात घोळ !

By admin | Published: October 2, 2014 12:33 AM2014-10-02T00:33:43+5:302014-10-02T00:33:43+5:30

खामगाव तालुक्यातील प्रकार; सहा इंची ऐवजी टाकली जातेय अडीच इंची पाईपलाईन.

Dalit fund funding! | दलितवस्ती निधीच्या कामात घोळ !

दलितवस्ती निधीच्या कामात घोळ !

Next

खामगाव: तालुक्यातील भालेगाव बाजार येथे ऐन निवडणुकीच्या काळात दलित वस्तीमध्ये सुरू असलेले भूमिगत पाईपलाईनचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसून या कामामध्ये कमालिचा भ्रष्टाचार केल्या जात असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे गावातील नागरिक या कामाबद्दल रोष व्यक्त करीत असून या कामाच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे. भालेगाव बाजार येथे समाजकल्याण विभागाकडून सन २0१२-१३ मध्ये दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ते आणि भूमिगत पाईपलाईनसाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार त्यावेळी खोदकाम करण्यात आले. मात्र, बरेचदिवस रखडलेले हे काम आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र, नियोजित अंदाजपत्रकानुसार हे बांधकाम होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांची आहे. पाईपलाईन टाकताना ६ इंची ऐवजी केवळ अडीच इंची पाईपलाईनचा वापर केल्या जात आहे. शिवाय रस्ता कॉक्रीटीकरणासाठी माती मिश्रीत रेतीसह, निकृष्ट दर्जाच्या सिमेंटचा वापर होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांचा आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ग्रामसेवक देवचे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. दरम्यान, या कामाबाबतची संपूर्ण माहिती घेवून पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांकडून चौकशी करण्यात येईल.दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकार्‍यांनी दिला आहे.

Web Title: Dalit fund funding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.