वादळी पावसाने सिंदखेड राजा तालुक्यात शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:30 PM2020-06-20T12:30:09+5:302020-06-20T12:30:24+5:30
नुकसानाचे पंचनामे त्वरित करण्याच्या सुचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून १२ हेक्टरवरील शेडनेट मधील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रकरणी नुकसानाचे पंचनामे त्वरित करण्याच्या सुचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या या नुकसानाची १९ जून रोजी पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी व महसूल प्रशासनास त्यांनी हे आदेश दिले.
सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगाव राऊत, विझोरा, उगला, पिंपळगाव लेंडी या गावासह लगतच्या भागात जावून पालकमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी केली.
सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रशासनास नुकसानाचे पंचनामे करण्यास मदत करावी असे आवाहन केले. सोबतच कोणताही व्यक्ती मदतीपासून वंचीत राहणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनास पाठविल्या जाईल. सोबतच या नुकसानाची मदत शेतकऱ्यांना लवकरच मिळावी, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे पालकमंत्र्यांनी पाहणीदरम्यान शेतकºयांसी बोलताना सांगितले. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अचानक अवकाळी झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेडनेटचेही नुकसान झालेले आहे. गेल्या वर्षीही अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा पावसाळ््याच्या प्रारंभीच हे नुकसान झाले आहे. नेटशेडचेही वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे.
(प्रतिनिधी)