बुलडाणा जिल्ह्यात ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:24 AM2020-08-19T11:24:24+5:302020-08-19T11:24:37+5:30

आठ हजार ५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १५९ गावातील शेतजमीन बाधीत झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

Damage to crops on 8000 hectares in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

बुलडाणा जिल्ह्यात ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या संतधार पावसानंतर १७ आॅगस्ट रोजी झालेल्या दमदार पावसादरम्यान सहा तालुक्यातील आठ हजार ५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १५९ गावातील शेतजमीन बाधीत झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.
जुलै महिन्यात १५ ते १६ आॅगस्ट दरम्यान शेगाव व खामगाव तालुक्यातील आठ मंडळात झालेल्या अतिवृष्टीत १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते तर २०० हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेली होती. त्यानंतरचे यंदाच्या पावसाळ््यातील दुसरे मोठे नुकसान आहे. १७ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसादरम्यान बुलडाणा, चिखली, संग्रामपूर, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा या सहा तालुक्यात प्रामुख्याने आठ हजार ५१ हेक्टरवरील पिकांचे हे नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यात चार हजार ११८ हेक्टर, चिखली तालुक्यात १,९४४ हेक्टर, संग्रामपूर तालुक्यात ८५, मेहकर तालुक्यात १५०, लोणार तालुक्यात ३२१, देऊळगाव राजा तालुक्यात ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
महसूल विभागने नुकसानाचे पंचनामे सुरू केले आहे. धाड व म्हसला मंडळामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून एकट्या बुलडाणा तालुक्यातील ८६० हेक्टरवरील जमीन खरडली असून नदी काठावरील पिकांना फटका बसला.


९१६ हेक्टरवरील जमीन खरडली
एकट्या बुलडाणा तालुक्यात ९१६ हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही शेत जमीन पुन्हा पुर्ववत कसण्या योग्य करण्यासाठी बराच कालावधी जावा लागणार असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात शेगाव व खामगाव तालुक्यातील आठ मंडळामधील २०० हेक्टर जमीनही अशीच खरडून गेली होती. त्यामुळे आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात १,०१६ हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेल्याचे वास्तव आहे.

 

Web Title: Damage to crops on 8000 hectares in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.