कांदा, हरभरा पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:32+5:302021-01-03T04:34:32+5:30
वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे कांदा, हरभरा पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक भागांत ...
वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे कांदा, हरभरा पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक भागांत धुके वाढले आहे. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढत असताना दोन दिवसांपासून सर्वदूर धुके दाटत आहे. गेल्या काही दिवसांपासून अधून-मधून ढगाळ हवामानामुळे शेतकरी त्रस्त होता. त्यात पुन्हा आता धुक्याची भर पडली आहे. दोन दिवसांपासून धुके पडत असून, सकाळी तर धुक्याची जाड चादरच निर्माण झालेली दिसते. कांदा पिकासाठी धुके धोकादायक समजले जात असून, परिणामी रब्बी पिकांना फटका बसत आहे. हरभरा, ज्वारी व गहू पिकाला धुके नुकसानकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. गहू, हरभरा या पिकालाही याचा मोठा फटका बसू शकतो असे शेतकऱ्यांनी सांगितले.
हरबरा पिकावर मावा व गव्हावर करपा, तांबूस रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक कसे वाचवावे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.
तानाजी भागडे, शेतकरी, सरस्वती