वादळामुळे फळबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:18+5:302021-05-12T04:35:18+5:30
तालुक्यातील जानेफळ मंडळातील उटी शिवारात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी फळबागेतून लाखो रुपये कमवत ...
तालुक्यातील जानेफळ मंडळातील उटी शिवारात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी फळबागेतून लाखो रुपये कमवत आहेत. रविवारी झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने उटी येथील शेतकरी मोतीराम हरमकर, संजय सुळकर, चंद्रपाल धोटे, अमोल धोटे, धनंजय धोटे, सुरेश काठोळे, मनिष आंधळे, विष्णू आंधळे, सोनाजी आमले, प्रकाश लाड, कासम भाई व अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे केळी व संत्रा पिकांच्या बागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाऱ्यामुळे संत्रा झाडे उन्मळून पडली तर केळीची झाडे जमिनीवर झोपली आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमाेर संकट उभे राहिले आहे. अगोदरच कोरोनामुळे शेती व शेतमालाचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. अशा परिस्थितीत या नैसर्गिक संकटाने शेतकरी खचून गेले आहेत. या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करून मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
काेट
कृषी अधिकारी व ग्रामसेवक यांना तत्काळ नुकसानीची माहिती देण्यात आली असून, तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी.
- वर्षा संजय सुळकर, सरपंच, उटी