वादळ, पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान; टोमॅटोचा प्लॉट जमीनदोस्त
By विवेक चांदुरकर | Published: November 27, 2023 06:05 PM2023-11-27T18:05:44+5:302023-11-27T18:06:23+5:30
अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील वानखेड गावात टोमॅटो व इतर भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले.
वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यात रविवारी रात्री विजांच्या कडकडासह वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील वानखेड गावात टोमॅटो व इतर भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले.
या भागाला रविवारी रात्री वादळी पावसाचा तडाखा बसला. रविवारी सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी पाऊस झाला. रात्री १० वाजतानंतर बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. तालुक्यात सर्वच गावांमध्ये पाऊस झाला. सोमवारीही दिवसभर रिमझिम पाऊस झाला. वानखेड येथील शेतकरी जगन्नाथ हरिभाऊ हागे यांचे टोमॅटो, मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले. एक एकरातील टोमॅटो पिकाचा संपुर्ण प्लॉट जमिनदोस्त झाला. सध्या या क्षेत्रातून टोमॅटोची काढणी सुरु झाली होती. बाजारात टोमॅटोला दरही मिळत आहेत. अशा स्थितीत संपुर्ण प्लॉट जमिनदोस्त झाला. गावात इतरही शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
पंचनामे करण्याची मागणी
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हजारो रुपये पिकासाठी खर्च केलेला असून ऐन पीक काढणीच्या काळातच आता पीक जमिनदोस्त झाल्याने मोठी आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे. आधीच खरीपात सोयाबीन पिकाचे उत्पादन कमी झाले आहे