आव्हा येथे वादळासह पावसाने गहु, मका पिकाचे नुकसान
By संदीप वानखेडे | Published: January 4, 2024 06:00 PM2024-01-04T18:00:16+5:302024-01-04T18:00:45+5:30
मोताळा : तालुक्यातील आव्हा परिसरात ४ जानेवारीला दुपारी ३ वाजता सुसाट वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू, तूृर, मका, गुरांचा चारा ...
मोताळा : तालुक्यातील आव्हा परिसरात ४ जानेवारीला दुपारी ३ वाजता सुसाट वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू, तूृर, मका, गुरांचा चारा कुट्टी, हरबरा ह्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना अल्प उत्पादन झाले़ दुष्काळ पडल्यामुळे खर्च देखील निघालेला नाही तर दुसरीकडे मोठ्या आशेने रब्बी हंगामाची मोठ्या आशेने लागवड शेतकऱ्याने केली़ त्याला रात्रं-दिवस पाणी देऊन फवारा खते देऊन आता पूर्णपणे मेहनत आटोपली असताना हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हातचा गेला आहे. त्यातच आव्हा परिसरात ४ जानेवारीला दुपारी ४ वाजता पावसामुळे गहू, मका आणि हरभरा पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ त्यामुळे, शेतकरी संकटात सापडले आहेत़