‘दामिनी’च्या सतर्कतेमुळे सावरले ‘तिचे’ आयुष्य!
By admin | Published: October 2, 2016 02:35 AM2016-10-02T02:35:42+5:302016-10-02T02:35:42+5:30
प्रियकराला चोप; धुळे जिल्ह्यातील युवतीला केले आईच्या स्वाधीन.
अनिल गवई
खामगाव (जि.बुलडाणा), दि. १- शिक्षणासाठी आई- वडिलांपासून दूर असलेली युवती एका भिन्न धर्मीय युवकाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. या गोष्टीचा लाभ उठवित सदर युवकाने तिला खामगाव परिसरात फिरायला आणले. दरम्यान, दामिनी पथकाची नजर या प्रेमीयुगलावर पडली. चौकशीतील सतर्कतेमुळे अखेरीस सदर युवतीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील नेर येथील कविता (बदललेले नाव) ही युवती उच्च शिक्षणासाठी धुळे येथे वास्तव्यास आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपूर्वी कविताचे जोसेफ (बदललेले नाव) या युवकाशी सूत जुळले. १५ दिवसांच्या अल्प कालावधीतच कविता जोसेफ सोबत बुधवारी धुळे येथून मोटारसायकलवर पळून आली.
बुधवारी शेगाव येथे फिरत असताना, सायंकाळच्या निवार्यासाठी दोघेही ह्यलॉजह्ण शोधत होते. दरम्यान, यादिवशी प्रेमीयुगलाच्या वास्तव्यावरून तणाव निर्माण झाल्याने, या युगलाला शेगावात ह्यलॉजह्ण उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हे प्रेमीयुगुल खामगाव येथे आले. या ठिकाणीही त्यांना जागा उपलब्ध न झाल्याने, मलकापूरच्या दिशेने निघालेल्या या जोडप्याला दामिनी पथकाने ताब्यात घेतले. यावेळी तरुणीची कसून चौकशी केली असता, सुरुवातीला तरुणीने उडवा-उडवीची उत्तरे दिली. दरम्यान, दामिनी पथकातील सदस्यांनी या तरुणीला खाक्या दाखविताच, तिने आपल्याबद्दलची सर्व हकिकत कथन केली. चौकशीत तरुणी ही धुळे जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्याने, तिच्या आईशी संपर्क साधण्यात आला. युवकाला चोप देत, दामिनी पथकाने चांगलीच अद्दल घडविली. दरम्यान, कविताला प्रेमाच्या जाळय़ात ओढणारा युवक आधीच दुसर्या युवतीशी ह्यएन्गेजह्ण असल्याचे बिंग फुटले. त्यामुळे या युवतीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे दामिनीच्या सतर्कतेमुळे कविताचे आयुष्य सावरले आहे.
रात्र झाल्याने या युवतीच्या आईला यायला विलंब लागणार असल्याचे लक्षात घेता, दामिनी पथकातील एका महिला सदस्याने कविताला रात्रभर घरी ठेवून, माणुसकी धर्माचाही प्रत्यय या घटनेच्या निमित्ताने दिला.