विजेच्या तारा खाली आल्यामुळे शेतकऱ्यांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:17+5:302021-05-19T04:36:17+5:30
पांगरखेड शिवारात गट नंबर ५४० मध्ये रामराव बढे यांचे शेत आहे. त्या शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारा झाडामध्ये अडकलेल्या आहेत. ...
पांगरखेड शिवारात गट नंबर ५४० मध्ये रामराव बढे यांचे शेत आहे. त्या शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारा झाडामध्ये अडकलेल्या आहेत. तसेच खाली येऊन जमिनीपासून अवघ्या पाच ते सहा फूट अंतरावर लोंबकळत आहे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या शेतकरी तथा मजुरांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे.
यामुळे येथे एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी तारांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच दिनकर बढे यांनी केली आहे. वारंवार तक्रार करूनसुद्धा विद्युत विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पावसाळा तोंडावर असताना धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे त्यापूर्वी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. धामणगाव बढे परिसरात मागील दिवसात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक विद्युत पोल कोलमडले आहेत. संबंधित ठेकेदार दुरुस्तीचे काम करीत आहे. परंतु परिसरातील छोठीमोठी कामेसुद्धा स्थानिक कर्मचारी करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.