नदीच्या पात्रात आढळली गतिमंद बालिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:00 AM2017-09-18T01:00:06+5:302017-09-18T01:02:13+5:30

अमडापूर: पेठ जवळच्या पैनगंगा पात्रात  एक ७ वर्षीय गतिमंद  बालिका जिवंत आढळल्याची घटना शनिवारी  उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Dangerous girl found in river bed! | नदीच्या पात्रात आढळली गतिमंद बालिका!

नदीच्या पात्रात आढळली गतिमंद बालिका!

Next
ठळक मुद्देपोलिसांनी गुराखी व अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने काढले बाहेरबालिकेला तीच्या आईनेच नदीत ढकलल्याचे तपासात निष्पन्नआरोपी रंजना काकडे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर: पेठ जवळच्या पैनगंगा पात्रात  एक ७ वर्षीय गतिमंद  बालिका जिवंत आढळल्याची घटना शनिवारी  उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अमडापूर पोलीस स्टेशनअंतर्गत  येणार्‍या पेठ येथील गुराखी  व आजूबाजूच्या शेतातील लोकांनी अमडापूर पो.स्टे.ला  महिती दिल्यावरून ठाणेदार विक्रम पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली पीएसआय उमेश भोसले, पोहेकाँ राजेश  गवई, पोना संजय नागवे, पोकाँ शेख अख्तर यांनी कोणताही  विलंब न करता घटनास्थळ गाठून गुराखी व आजूबाजूच्या  लोकांच्या सहकार्याने या ७ वर्षीय गतिमंद मुलीला नदीच्या  पात्रातून बाहेर काढले. तिची ओळख पटविण्यासाठी माहिती  काढणे सुरू केले असता सामाजिक कार्यकर्ते रवींद्र नारायण  डाळीमकर, क व्हळा हे जात असताना त्यांनी ही मुलगी  आमच्या गावातील शोभा पांडुरंग गुंड यांची नात असल्याचे  सांगितल्यावरून पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घे तला. सदर गतिमंद मुलगी समाधान काकडे रा. धोत्रा नाईक,  ह.मु. उंद्री यांची असल्याचे मुलीच्या आजीने सांगि तल्यावरून पोलिसांनी मुलीची आई रंजना समाधान काकडे  (वय ३२) हिला ताब्यात घेऊन तिची विचारणा करून  ितनेच मुलगी नदीपात्रात टाकली असल्याचे सांगितले. या  महिलेला एक मुलगी व एक मुलगा असून, दोन्ही मुले ग ितमंद असून, पती समाधान हे धोत्रानाईक येथे किराणा  दुकानावर काम करतात. या दोघांची परिस्थिती अत्यंत हला खीची आहे. याबाबत  फिर्यादी रवींद्र नारायण डाळीमकर (व  ३६) रा. कव्हळा यांनी अमडापूर पो.स्टे.ला तक्रार दिली की,  आरोपी रंजना  काकडे रा. धोत्रा नाईक हिने तिची मुलगी ग ितमंद ७ वर्षीय साक्षी हिला नदीपात्रात सोडून दिले. अशा  तक्रारीवरून आरोपी रंजना काकडे  हिच्याविरुद्ध  कलम  ३0७ प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार  विक्रम पाटील हे करीत आहेत.
-

Web Title: Dangerous girl found in river bed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.