वापरलेल्या ‘मास्क’मुळे पशुंना धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:47 AM2020-04-11T11:47:48+5:302020-04-11T11:48:10+5:30
मास्क वापरानंतर कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात, रस्त्यावर अथवा कुठेही उघड्यावर फेकण्यात वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: करोनापासून वाचण्यासाठी चिखलीकरांनी गेल्या अनेक दिवसांपासून तोंडाला मास्क लावण्यास सुरूवात केली. त्यातच आता पालीका प्रशासनानेही मास्क लावणे बंधनकारक केले आहे; मात्र, हे मास्क वापरानंतर कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात, रस्त्यावर अथवा कुठेही उघड्यावर फेकण्यात वाढ झाली आहे. यामध्ये एकाद्या कोरोना बाधीत रूग्णाचा मास्क असल्यास त्याव्दारे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे माणासांप्रमाणे शहरात मुक्त संचार करणाºया जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
‘करोना’चा प्रादुर्भाव स्वत:च्या खबदारीसाठी प्रत्येकजण मास्क घालूनच वावरत आहेत. शहरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने यापृष्ठभूमीवर पालीका प्रशासनाने ९ एप्रिल पासून शहरवासीयांना ‘मास्क’ वापरणे बंधनकारक केले. मात्र मास्क वापरून झाल्यानंतर कोणतीही काळजी न घेता तो बिनदिक्कतपणे कोठेही टाकला जाते. कधी कचºयात, रोडवर हे वापरलेले मास्क टाकल्या जात असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. एखाद्या कोरोना बाधित रूग्णाने वापरलेले मास्क असल्यास त्यापासून कळत नकळत इतर नागरिक, सफाई कामगारांच्या आरोग्याला धोका आहे. जनावरे कचºयात अन्न शोधत असतात, त्या कचºयात असे वापरलेले मास्क असल्याने मानवांप्रमाणे पशुंनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. मास्कचा वापर झाल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
वापरलेले मास्क, ग्लोज, रूमाल, प्लास्टीक पिशव्या आदी रोडवर किंवा खुल्या जागेवर टाकू नये, अनेक जनावरे व पाळीव प्राण्यांच्या खाण्यात या वस्तू येतात. यातून कोरोनासारख्या विषाणूचा संसर्ग होण्यासह या वस्तू खाण्यात आल्याने जनावरे मृत होतील, त्यामुळे सर्वांनी जाबाबदारीपूर्वक वागावे व मुक्या प्राण्यांवर दया दाखवावी.
-डॉ. प्रविण निळे, पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी २) पेठ, ता.चिखली.