निर्माल्यामुळे तलावांना धोका!
By admin | Published: September 21, 2016 02:21 AM2016-09-21T02:21:04+5:302016-09-21T02:21:04+5:30
बुलडाणा शहरातील प्रकार.
बुलडाणा, दि. २0 - स्थानिक बुलडाणा-धाड रस्त्यावरील सरकारी बगिच्या तलावात गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात निर्माल्य टाकल्यामुळे तलावास धोका निर्माण झाला आहे. तलावाच्या काठालगत मोठय़ा प्रमाणात निर्माल्य व गणेशमूर्ती टाकल्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले असून, निर्माल्यामुळे दुर्गंंधी येत आहे.
बुलडाणा-धाड रस्त्यावरील सरकारी बगिच्या तलावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठय़ा प्रमाणात गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पालिकेतर्फे निर्माल्य गोळा करण्यासाठी कर्मचारी ठेवण्यात आले होते, तसेच गणेश भक्तांना निर्माल्य तलावात न फेकण्याचे आवाहन केले होते; मात्र तरीही काही गणेश भक्तांनी गणेश मूर्ती विसर्जन करताना तलावात मोठय़ा प्रमाणात निर्माल्य टाकले. निर्माल्य तलावाच्या काठालगत मोठय़ा प्रमाणात साचले असून, काही ठिकाणी निर्माल्याची दुर्गंधी येत आहे. या तलावालगत मागील काही महिन्यां पासून बांधकाम करण्यात आले असून, नागरिकांना फिरण्यासाठी ट्रॅक तयार करून परिसराचे सौंदर्यीकरण करण्या त येत आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य टाकल्यामुळे या सौंदर्यास बाधा येत आहे. येणार्या काळात निर्माल्यासह परिसरातील विविध झाडांचा कचरा टाकल्यास तलावाचे सौंदर्यीकरण टिकण्याऐवजी त्यास बाधा येईल.
विहिरी धोक्यात!
गणेश विसर्जनदरम्यान शहर परिसरातील तलावासह विहिरीतही गणेश मूर्तींंचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विहिरीत मोठय़ा प्रमाणात निर्माल्य टाकण्यात आले. हे निर्माल्य महिनो-महिने विहिरीतील पाण्यात कुजून पाणी दूषि त होत आहे. या विहिरींचे पाणी कोणी पित नसले तरी पाण्याची दुर्गंंधी येत असल्यामुळे कोणी वापरण्यास घेत नाही. अशा प्रकारे निर्माल्यामुळे तलावासह परिसरातील विहिरींना धोका निर्माण झाला आहे.