खचलेल्या, बुजलेल्या विहिर दुरुस्तीची कामे अडकली मंजुरीत!

By admin | Published: December 30, 2014 12:00 AM2014-12-30T00:00:25+5:302014-12-30T00:04:08+5:30

अमरावती विभागात तीन हजारांवर विहिरींच्या कामांसाठी प्रशासकीय मंजूरी रखडली.

Dangers, damaged sidewalk works are stuck! | खचलेल्या, बुजलेल्या विहिर दुरुस्तीची कामे अडकली मंजुरीत!

खचलेल्या, बुजलेल्या विहिर दुरुस्तीची कामे अडकली मंजुरीत!

Next

संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अतवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीची कामे तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीअभावी रखडली आहेत. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये ३ हजार ३४ विहिरींच्या दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत.
गतवर्षी (२0१३) पावसाळ्यात राज्यातील विविध भागात अतवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांच्या विहिरी गाळाने बुजल्या, तर काही ठिकाणी विहिरी खचल्या आहेत. शेतातील विहिरी बुजल्याने आणि खचल्यामुळे शेतकर्‍यांना पाण्याविना पीक घेणे शक्य नव्हते. या पृष्ठभूमीवर राज्यात अतवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यास गत २३ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. अतवृष्टीमुळे बुजलेल्या विहिरींचे कृषी व महसूल खात्याच्या अधिकार्‍यांमार्फत पंचनामे करून, बुजलेल्या विहिरींची नोंद सात-बारावरून कमी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देशही या शासन निर्णयान्वये देण्यात आले होते.
खचलेल्या विहीर दुरुस्तीच्या कामासाठी अंदाजपत्रकास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे; मात्र तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त नसल्याने, विहिरींच्या दुरुस्तीची कामे सुरु होवू शकली नाही. संबंधित यंत्रणेच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजूरीअभावी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात बुजलेल्या व खचलेल्या ३ हजार ३४ विहिरींच्या दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यामध्ये २ हजार ९२९ खचलेल्या आणि १0५ बुजलेल्या विहिरींचा समावेश आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अतवृष्टीमुळे खचलेल्या आणि बुजलेल्या शेतकर्‍यांच्या विहिर दुरुस्तीची कामे रोहयोअंतर्गत करावयाची आहेत. त्याअनुषंगाने जिल्हानिहाय किती कामांसाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली, यासंदर्भात विभागातील पाचही जिल्ह्यांच्या उपजिल्हाधिकारी (रोहयो) कडून माहिती मागविण्यात आली असल्याचे अमरावती विभाग उपायुक्त (रोहयो) एस.टी.टाकसाळे सांगीतले.



अमरावती विभागात बुजलेल्या-खचलेल्या विहिरी!
जिल्हा              खचलेल्या           बुजलेल्या               एकूण
अमरावती             ५८३                    . ..                       ५८३
अकोला                 ९६                       ..                      0९६
यवतमाळ              २३                      ..                       0२३
बुलडाणा               ७६४                   १0५                     ८६९
वाशिम                १४६३                  ..                        १४६३
....................................
एकूण                  २९२९                १0५                       ३0३४
....................................
 

Web Title: Dangers, damaged sidewalk works are stuck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.