खामगाव जवळ दुचाकीला टिप्परची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:29 AM2018-02-12T01:29:10+5:302018-02-12T01:30:44+5:30
खामगाव: नांदुरा रोडवरील सुटाळा खुर्द फाट्याजवळ ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकी चालक काशिनाथ विश्वनाथ वाकोडे रा. सुटाळा बु. यांचा जागीच मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: नांदुरा रोडवरील सुटाळा खुर्द फाट्याजवळ ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकी चालक काशिनाथ विश्वनाथ वाकोडे रा. सुटाळा बु. यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार काशिनाथ विश्वनाथ वाकोडे (वय ३९, रा. सुटाळा बु.) हे रेल्वे धक्क्यावर हमालीचे काम करीत असत. रविवारी सकाळी ते घरून दुचाकीवर (क्र.एम.एच.२८-एल.१११५) रेल्वे धक्क्याकडे कामासाठी जात असताना सुटाळा खुर्द फाट्याजवळ टिप्परचा (क्र.एम.एच.२८-एबी.७७१३) चालक प्रल्हाद समाधान वाकोडे (रा. घाटपुरी) याने त्याच्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने चालवून समोरून येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत काशिनाथ वाकोडे हे टिप्परच्या समोरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी पंचनामा केला. मृतक काशिनाथ वाकोडे यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णायात पाठविण्यात आले. अपघातग्रस्त दोन्ही वाहने शहर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आली आहे. टिप्पर चालक प्रल्हाद समाधान वाकोडे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तपास पोलीस कॉन्स्टेबल चौधरी, शेळके करीत आहेत.