कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:05+5:302021-05-29T04:26:05+5:30
- स्वत:ला व्यक्त करताना अडचणी-- अंध व्यक्तिंना स्पर्शाने अनेक गोष्टींची ओळख होत असते. याद्वारे ते आपल्या भावना व्यक्त करू ...
- स्वत:ला व्यक्त करताना अडचणी--
अंध व्यक्तिंना स्पर्शाने अनेक गोष्टींची ओळख होत असते. याद्वारे ते आपल्या भावना व्यक्त करू शकतात, तर दुसरीकडे मूकबधीर ओठांच्या हालचालीने संवाद साधत असतात आणि स्वत:ला व्यक्त करतात; परंतु कोरोना काळात यांना अनेक अडचणी येत आहेत.
--कोट--
कोरोना काळात दिव्यांग बांधवांना अडचणी येत आहेत. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. या दिव्यांगांना फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे. फाऊंडेशनतर्फे दिव्यांगांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील. अशा दिव्यांगांसाठी रुग्णवाहिकेची सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे.
- अशोक काकडे, अध्यक्ष, दिव्या फाऊंडेशन.
--आधारही एकमेकांचाच!--
घरखर्च भागविण्यासाठी आम्ही छोटी मोठी कामे करत होतो. परंतु दिव्यांगांसाठी काम करून त्यांना मदत करत होतो. कोरोना आल्यापासून दिव्यांगांनाही आधार राहिला नाही. कोरोना रुग्ण वाढत आहेत व निर्बंध असल्याने बाहेर निघणे बंद आहे.
- नीलेश चोपडे.
--कोट--
पूर्वी बसस्थानक परिसरात भीक्षा मागून पोट भरत होतो. परंतु आता कोरोनामुळे बसस्थानकावर एकही प्रवासी नाही. त्यामुळे शीव भोजनाचाच आधार मिळत नाही. कोरोनाने कठीण दिवस आणले आहेत.
- एक अंध.