डाटा ऑपरेटर्सना संप भोवला

By admin | Published: December 13, 2014 12:20 AM2014-12-13T00:20:23+5:302014-12-13T00:20:23+5:30

व्हीएलई करार रद्द : ऑपरेटर्सना कामावरुन काढले

DATA OPERATORS | डाटा ऑपरेटर्सना संप भोवला

डाटा ऑपरेटर्सना संप भोवला

Next

दगडू तायडे / जनुना (बुलडाणा)
तालुक्यातील गावागावातील ग्रामपंचायतच्या कामात सुसूत्रता यावी, नागरिकांची कामे सुलभ व त्वरित व्हावी, यासाठी ९६ ग्रा.पं.मध्ये ८८ ग्रामपंचायत डाटा ऑपरेटरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या; मात्र तब्बल ऑगस्ट ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत ग्रा.पं.चे डाटा ऑपरेटर संपावर राहिले. परिणामी याचा ग्रा.पं. कामावर मोठा परिणाम झाल्याने जिल्हा परिषदेच्या जिल्हा समन्वयकांनी सदर व्हीएलई करार रद्द केला. त्यामुळे डाटा ऑपरेटरांना हा संप भोवला असून, त्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे.
जन्म प्रमाणपत्र, नमुना ८ यासह कितीतरी सुविधा ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन झाल्या आहेत. या सुविधेमुळे नागरिकांची कामेही सुलभ व त्वरित होत आहेत; मात्र तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर संपावर असल्याने ही सेवा खोळंबली होती.
या कालावधीत ग्रा.पं. स्तरावरील संग्राम प्रकल्प अंतर्गत असलेले कोण तेही कामकाज ग्रा.पं. डाटा ऑपरेटरांनी पूर्ण केले नाही; तसेच मागील तीन महिन्याच्या कालावधीत दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही. संग्राम प्रकल्पांतर्गत संगणक परिचालकाचे कंत्राट रद्द करण्याचे सर्व अधिकार कंपनी प्रशासनाने आपल्याकडे राखून ठेवले होते. परिणामी डाटा ऑ परेटर संघटनेने संपामध्ये मोठय़ा प्रमाणावर नियमांचे उल्लंघन केले होते. यामुळे जिल्हा समन्वयाकडे मोठय़ा प्रमाणावर तक्रारी वाढल्याने त्यांनी व्हीएलई सेवा करार रद्द केला.

Web Title: DATA OPERATORS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.