मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग, पतीसह सासूला मारहाण; ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

By सदानंद सिरसाट | Published: December 3, 2023 08:21 PM2023-12-03T20:21:59+5:302023-12-03T20:22:06+5:30

याप्रकरणी तक्रारीवरून तीन महिलांसह नऊ पुरुषांवर खामगाव ग्रामीण पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल केला.

Daughter-in-law angry with love marriage, beating mother-in-law with husband; A case has been registered with the rural police | मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग, पतीसह सासूला मारहाण; ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग, पतीसह सासूला मारहाण; ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

खामगाव (बुलढाणा) : मुलीने पळून जाऊन विवाह केल्यानंतर ती सासरच्या घरी आली असताना घरात घुसून पतीसह सासूला १२ जणांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पारखेड येथे रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी तक्रारीवरून तीन महिलांसह नऊ पुरुषांवर खामगाव ग्रामीण पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल केला.

पारखेड येथील श्रीपाद सोमनाथ आणेकर (४७) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये त्यांचा मुलगा गौरव आणेकर याने गावातील दिव्या नामक मुलीसोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. दरम्यान, त्यांच्या घरी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असल्याने ते दोघेही परतले. यावेळी त्या मुलीची आई शीला मंगलसिंग चव्हाण ही घरात आली. तिने काहीएक कारण नसताना मुलीच्या सासूला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी लीलाबाई कैलास डाबेराव, पहाडिंग कैलास डाबेराव, सुशिला फुलसिंग पवार, पहाडसिंग फुलसिंग पवार, महेंद्रसिंग प्रतापसिंग चव्हाण, दुर्गासिंग प्रतापसिंग चव्हाण, श्रीकृष्ण प्रतापसिंग चव्हाण, महादेव फुलसिंग पवार, विक्रम नरसिंग सोळंके, नवलसिंग मोहनसिंग राठोड, हरिभाऊ लयेनसिंग सोळंके यांनी हातात लाठ्या - काठ्या, दगड घेऊन घरात प्रवेश केला. त्यावेळी गौरव याला जबर मारहाण करण्यात आली. घरातील सामानाची फेकाफेक केली.

तीन दुचाकी, एक चारचाकी गाडीची तोडफोड करून नुकसान केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तीन महिलांसह नऊ पुरूष आरोपींवर भादंविच्या कलम १४३, १४६, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोहेकॉ. देवराव धांडे करीत आहेत.

Web Title: Daughter-in-law angry with love marriage, beating mother-in-law with husband; A case has been registered with the rural police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.