दिवस काकस्पर्शाचे
By admin | Published: September 10, 2014 02:09 AM2014-09-10T02:09:14+5:302014-09-10T02:09:14+5:30
पितृपक्षास प्रारंभ : आधुनिक युगातही o्रद्धा कायम
बुलडाणा : अनंत चतुदश्रीच्या दुसर्या दिवसापासून पितृपक्षाचा प्रारंभ झाला आहे. पितृपक्षात आपले पूर्वज कुटुंबीयांच्या सानिध्यात येतात, अशी श्रद्धा आजच्या इंटरनेटच्या युगातही कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे पितृपक्षाच्या साहित्य खरेदीला बाजारपेठेत वेग आलेला आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील, त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध करण्याची प्रथा आहे. या पंधरवड्यात आपल्या पुर्वर्जांचे तर्पण केल्या जाते. अश्विन महिन्यातील अमावास्येपर्यंत हा पितृपक्ष असतो. या काळात अन्नदान केले जाते. मात्र हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही नवकार्याच्या शुभारंभासाठी हा पंधरवडा अशुभ मानला जातो. या काळात कोणत्याही नवकार्याचा, खरेदीचा आरंभ न करण्याची परंपरा आहे; परंतु ती चुकीची आहे. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ आपण ज्येष्ठांच्या वंदनेने आणि आशीर्वादाने करीत असतो. असे वंदनीय ज्येष्ठ आत्मरुपाने ज्या काळात आपल्या निवासस्थानी येतात, आशीर्वाद देतात तो काळ अशुभ कसा असू शकेल, असा नवा विचार सध्या रुढ होतो आहे.