आरटीई प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 04:13 PM2020-08-26T16:13:34+5:302020-08-26T16:13:40+5:30
३१ आॅगस्ट पर्यंत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी राबविल्या जाणाºया २५ टक्के प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत असून ३१ आॅगस्ट पर्यंत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील २६९९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
आतापर्यंत १५७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. ११२३ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे राज्यभरात आरटीई अंतर्गंत २५ टक्के प्रवेश आॅनलाईन प्रक्रीया राबविण्यात येत आहे. १७ मार्च रोजी विद्यार्थ्यांची सोडत (लॉटरी) काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.अनेक विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या शाळेत संपर्क केलेला नसल्याचे चित्र आहे. ज्या शाळेसाठी निवड झाली आहे त्या शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेउन ३१ आॅगस्टच्या आत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. तसेच कोरोना व्हायरचा संसर्ग पाहता पालकांनी शाळांमध्ये गर्दी करून. शाळेत जाउन प्रवेश करणे शक्य नसेल तर ई मेलद्वारे कागदपत्रे शाळेत पाठवून दुरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करून प्रवेश निश्चित करावा, ३१ आॅगस्टनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी उपशिक्षणाधिकारी यु.एन. जैन यांनी दिली.
ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या शाळांनी पालकांशी संपर्क साधून त्यांना प्रवेश निश्चित करण्याविषयी सूचना देण्याची गरज आहे. अनेक शाळांनी पालकांना लॉटरीविषयी माहितीच दिली नसल्याचे चित्र आहे.
३१ आॅगस्टपूर्वी प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन
बुलडााणा जिल्ह्यातील ११२३ विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत निवड होउनही प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे, पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश ३१ आॅगस्टपर्यंत निश्चित करावा. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.शाळांनीही निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून प्रवेशाची सूचना द्यावी, असे आवाहन प्रभारी उपमुख्याधिकारी यु.एन.जैन यांनी केले आहे.