संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:20 AM2017-08-24T00:20:34+5:302017-08-24T00:21:55+5:30
शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमाव्दारे पार पडला. या उत्सवात श्री गणेश यागास व वरूण यागास मंगळवारी प्रारंभ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमाव्दारे पार पडला. या उत्सवात श्री गणेश यागास व वरूण यागास मंगळवारी प्रारंभ झाला.
२६ ऑगस्टला १0 वा. यागाची पूर्णाहूती व अवभृतस्नान होईल व दुपारी २ वा. श्रींच्या पालखीची रथ मेणा इत्यादीकांतून गज, अश्वासह नगर परिक्रमा होईल. २२ रोजी विश्वस्त विश्वेश्वर त्रिकाळ यांच्या हस्ते ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत यागास प्रारंभ करण्यात आले. २६ रोजी मिनी भाद्रपद शु.५ ला श्रीरामबुवा ठाकूर परभणी यांचे सकाळी ७ ते ९ श्रींचे समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन होणार आहे. २७ रोजी श्रीधरबुवा आवारे मु.खापरवाडी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होणार आहे. व नंतर दहीहंडी, गोपाळकाला होईल.
श्री पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात सकाळी ५ ते ६ काकडा, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, रात्री ८ ते १0 कीर्तन, सायंकाळी ५.३0 ते ६ हरिपाठ होत आहे. यात २२ रोजी मदनबुवा बिल्लारी रा. हराळ, २९ रोजी अंबादासबुवा चौधरी अमळनेर, २४ ला प्रकाशबुवा शास्त्री धुळे, २५ ला मच्छिंद्रबुवा अहिरे वाडी भोकर, २६ ला श्रीरामबुवा ठाकूर परभणी यांचे नित्यनेमाने कीर्तन होत आहे.
श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव निमित्त सर्व भक्तांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात गर्दी लक्षात घेता भक्तांच्या सोयीसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे.
श्रींच्या यात्रा उत्सवात ३७ बसेसची अतिरिक्त व्यवस्था
श्रींच्या यात्रा उत्सवादरम्यान २५ ते २७ पर्यंत खामगाव आगार ५ गाड्या, शेगाव आगार ८ गाड्या, चिखली आगार ५ गाड्या, मेहकर आगार ९ गाड्या, जळगाव आगार ५ गाड्या, मलकापूर आगार ५ गाड्या अशा ३७ गाड्या जास्तीच्या राहणार आहेत. यास्तव सावळे शाखा व्यवस्थापक व प्रशिक्षणार्थी १५ वाहक हे २५ ते २७ च्या दरम्यान होत असलेली गर्दी लक्षात घेता प्रवाशांना सोयीसाठी कार्यरत राहणार आहे. यासोबत तेल्हारा व अकोट आगाराच्या अतिरिक्त वाहतुकीच्या गाड्यांची व्यवस्था केल्या जाणार असल्याचे शेगाव आगाराच्यावतीने ए.जी. मुसळे यांनी सांगितले आहे. तसेच शेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे.