भाेसा येथील आणखी दाेघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:42+5:302021-05-23T04:34:42+5:30
भाेसा : गावात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरू आहे़ दाेन दिवसात आणखी दाेघांचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ ...
भाेसा : गावात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरू आहे़ दाेन दिवसात आणखी दाेघांचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे़ तसेच सात जण ऑक्सिजनवर आहेत़ त्यामुळे, मेहकर तालुक्यात भाेसा गाव काेराेना हाॅटस्पाॅट ठरत आहे़
गावात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहेत़ काही दिवसांपूर्वी गावातील एकाच घरातील दाेघांचा मृत्यू झाला हाेता़ तसेच २१ मे राेजी गावातील ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर २२ मे राेजी आणखी ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे गावातील मृतकांची संख्या चारवर पाेहोचली आहे़ तसेच सात जण अजूनही ऑक्सिजनवर आहेत़ आरोग्य विभागाच्या वतीने भोसा येथे दररोज आरटीपीसीआर व रॅपिड टेेस्ट घेण्यात येतात. मात्र ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव गावात राहत नसल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना जमिनीवर बसून कोरोना रॅपिड टेस्ट करावी लागत आहे. गावस्तरीय समितीमध्ये आरोग्य िविभागाच्या आरोग्य सेविका लता कडू, आरोग्य सेवक किशोर धोटे व शिक्षक बा़ रा़ भगत, तलाठी शिवप्रसाद म्हस्के हेच कार्यरत असून ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आऱ जी़ न कृपाळ गैरहजर राहत असल्याचे चित्र आहे़ काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरत असलेल्या भाेसा गावात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे़