आणखी एका महिलेचा मृत्यू; ७२ नवे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 11:10 AM2020-08-30T11:10:04+5:302020-08-30T11:10:39+5:30

बुलडाणा शहरातील २५ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

The death of another woman; 72 new corona positive | आणखी एका महिलेचा मृत्यू; ७२ नवे कोरोना पॉझिटिव्ह

आणखी एका महिलेचा मृत्यू; ७२ नवे कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून २९ आॅगस्ट रोजी आणखी एकाचा मृत्यू झाला असून ७२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ५५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्णसंख्या २९८३ वर पोहचली असून ८३१ जणांवर उपचार सुरू आहेत. बुलडाणा शहरातील २५ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३८ व रॅपिड टेस्टमधील ३४ अहवालांचा समावेश आहे.दे. राजा येथील दोन , धोत्रा नंदाई ता. दे. राजा येथील तीन , मेंडगाव ता. दे. राजा येथील सहा, दे. मही ता. दे. राजा येथील एक , बुलडाणा शहरातील रामनगर दोन, शिक्षक कॉलनी एक , केशव नगर तीन, चांडक ले आऊट एक, चिखली शहरील तीन , वाल्मीक नगर एक, चिखली तालुका कारखेड एक, पांढर देव एक, शे. आटोल एक, पेठ एक, आंधाई चांधाई एक, मलकापूर शहरातील बरादरी एक, लोणार एक, नांदुरा शहर येथील एक, गावंडेपुरा दोन , हेलगे नगर दोन , नांदुरा तालुक्यात निमगाव एक, मळेगाव गोंड एक, रसुलपुर एक, शेगाव आरोग्य कॉलेनी एक, मोदी नगर एक राधाकृष्ण मॉल जवळ तीन, शेगाव तालुक्यातील माटरगाव एक, एकलारा ता. संग्रामपूर येथील एक, खामगाव शहर दोन , व्यंकटेश नगर एक, वाडी तीन, कदमापुर ता. खामगाव येथील पाच , जळगाव जामोद शहरातील चार , माळी फैल येथील दोन 2, उमरद ता. सिंदखेड राजा येथील सहा , मेहकर शहरातील तीन , मेहकर तालुका हिवरा खुर्द येथील एका संशयीत रुग्णांचा समावेश आहे.


जिल्ह्यात चार दिवसात चौघांचा मृत्यू
जिल्ह्यात गत चार दिवसात चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत १७ हजार २९० रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत २ हजार १०६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ७७७ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण दोन हजार ९८३ रुग्ण असून त्यापैकी दोन हजार १०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ८३१ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ४६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी दिली आहे.

Web Title: The death of another woman; 72 new corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.