रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू

By admin | Published: May 17, 2017 01:24 AM2017-05-17T01:24:08+5:302017-05-17T01:24:08+5:30

खामगाव : जलंब शिवारातील लांजुड व कुरखेड भागात रेल्वेखाली कटून दोन अनोळखी इसमांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Death of both of them by trapping under train | रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू

रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू

Next

खामगाव : जलंब शिवारातील लांजुड व कुरखेड भागात रेल्वेखाली कटून दोन अनोळखी इसमांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
जलंब रेल्वे पोलीस हद्दीतील लांजुड शिवारात पोल क्र.५३७ जवळ रेल्वेखाली कटलेल्या अवस्थेत ५० वर्षीय इसमाचा मृतदेह रेल्वे पोलिसांना मिळून आला, तसेच याच रुळावरील कुरखेड शिवारातील पोल क्र.५२८ जवळच आणखी एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा कटलेल्या स्थितीत मृदतेह पोलिसांना दिसून आला. सदर दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपरोक्त दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्याचे आवाहन जलंब रेल्वे पोलिसांनी केले आहे.

Web Title: Death of both of them by trapping under train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.