पोलीस ठाण्याच्या आवारात चिमुकलीचा मृत्यू
By admin | Published: December 15, 2014 12:34 AM2014-12-15T00:34:50+5:302014-12-15T00:34:50+5:30
पिंपळगाव राजात तणाव
पिंपळगाव राजा (बुलडाणा): येथील पोलिस ठाण्याच्या आवारात खेळण्याकरीता गेलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा विद्युतचा शॉक लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर असे की, पि.राजा पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या कक्षालगतच्या भिंतीजवळ बगिचा करण्यात आला आहे. या बगिच्याला तारेचे कुंपन असून, आज दुपारी पोलीस ठा ण्याजीकच्या दलित वस्तीतील लहान मुले या ठिकाणी खेळण्याकरीता गेले होते. दरम्यान, बगिच्यातील पडलेल्या बदाम वेचण्यासाठी प्राजक्ता रवींद्र तेलंग ( ६) या मुलीने या ताराच्या कंपाउंडला स्पर्श केला असता, तिच्या डाव्या हातीची बोटे व तिच्या हाताला विद्युतचा शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाला. काही वेळ ही चिमुकली या ठिकाणी पडलेली होती. त्यानंतर ही बाब पोलीस कर्मचार्यांच्या लक्षात आली. दरम्यान, दिलीप सुखदेव तेलंग व कैलास तेलंग हे पोलीस ठाण्याच्या आवारात धावत आले व त्यांनी या चिमुकलीची ओळख दिली आणि खामगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी प्राजक्ताचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले.
सदर घटना पोलीस ठाण्याच्या आवारात घडल्याने पोलिसांनी या घटनेची आकस्मिक नोंद करून आज सायंकाळी ७ वाजता मृतक प्राजक्ताचे शवविच्छेदन केले. तिचा मुत्यू हा विद्युतचा शॉक लागून झाल्याचे स्पष्ट झाले. मृतक प्राजक्ताला एक लहान भाऊ व बहीण आहे, तर तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
सदर पोलीस ठाण्याच्या इमारतीवर असलेल्या टिनाच्या छताला ाुद्धा विद्युत करंड आला होता, अशी माहीती पोलिस उपनिरीक्ष साठे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. ही इमारत ब्रिटिशकालीन असून या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या इमारतीतील फिटिंगसह इमारतीची दुरुस्ती व्हावी, संबंधित ठाणेदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना अनेक वेळा इमारतीच्या दुरावस्थेबाबत लेखी कळविले आहे; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याने आज या सहा वर्षीय चिमुकलीला आपली जीवन यात्रा संपवावी लागली. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच दखल घेतली असती, तर ही दुर्दैवी घटना घडली नसती.