मलकापूरमधील कोरोनाबाधीताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 13:05 IST2020-06-14T13:04:42+5:302020-06-14T13:05:03+5:30
मलकापूर: येथील गजबजलेली वस्ती असलेल्या पारपेठ भागात ६५ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा बुलडाणा येथील कोवीड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान १३ जून रोजी मध्यरात्री मृत्यू झाला.

मलकापूरमधील कोरोनाबाधीताचा मृत्यू
मलकापूर: येथील गजबजलेली वस्ती असलेल्या पारपेठ भागात ६५ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा बुलडाणा येथील कोवीड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान १३ जून रोजी मध्यरात्री मृत्यू झाला.
दरम्यान, यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाºयांसह त्यांचे पथक या भागात गेले असून हा परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भागात लोकसंख्येची घनात अधिक असल्याने प्रतिबंधीत क्षेत्रातील नियम अधिक काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.
मृत पावलेला व्यक्ती स्वत:हून रुग्णालयात तीन दिवसापूर्वी दाखल झाला होता. सारीच्या आजाराची लक्षणे त्याच्यात दिसून आली होती. आल्यापासूनच त्याची प्रकृती काहीशी गंभीर होती. त्यातच १३ जून रोजी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला स्वॅबचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, मलकापूर शहरात कोरोना बाधीतांची संख्या सातत्याने वाढत असून मलकापूर शहर हे कोरोना बाधीतांचा हॉटस्पॉट बनले आहे. मलकापूरात सर्वच ठिकाणी कोरोना पाँझीटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात देखील त्याचा शिरकाव झाला आहे. आता शहरात त्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी स्वत:च आपली काळजी घेण्याची गरज आहे.
शासनाचे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास स्वत: पुढे याव.तपासणी करून घ्यावी. तेव्हाच परिस्थिती आटोक्यात आणता येईल.
- सुनील विंचनकर उपविभागीय अधिकारी मलकापूर