खामगावातील दाेघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:13+5:302021-05-13T04:35:13+5:30
नांदुरा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण बुलडाणा : नांदुरा तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून, बुधवरी शहर आणि तालुक्यात १३७ रुग्ण ...
नांदुरा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
बुलडाणा : नांदुरा तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून, बुधवरी शहर आणि तालुक्यात १३७ रुग्ण आढळले आहेत. गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
काेराेना चाचण्यांचा अहवाल तातडीने द्या
देऊळगाव राजा : गत काही दिवसांपासून काेराेना चाचण्या करणाऱ्यांचे अहवाल मिळत नसल्याचे चित्र आहे. अहवाल उशिरा मिळत असल्याने पाॅझिटिव्ह रुग्ण शहरात फिरत असल्याने, संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे. त्यामुळे काेराेना चाचण्यांचे अहवाल तातडीने देण्याची मागणी हाेत आहे.
बॅंका सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी
बुलडाणा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रशासनाने १० मेच्या रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधामध्ये बॅंकाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. बॅंकाचे व्यवहार सुरळीत ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेती मशागतीसाठी डिझेल मिळणार
बुलडाणा : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने २० मेपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. या दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच पेटाेल व डिझेल देण्याचे आदेश देण्यात आले हाेते. मात्र, प्रशासनाने आदेशात सुधारणा करीत शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी डिझेल देण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
धान्य वितरण सुरळीत सुरू राहणार
बुलडाणा : कडक निर्बंधाच्या काळात धान्य वितरण प्रणाली सुरळीत सुरू राहण्याचे दृष्टीने सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गतची वाहतूक व वाटप सुरू ठेवण्यात येणार आहे.
शिवभाेजन पार्सलची वेळ वाढविली
बुलडाणा : कडक निर्बंधाच्या काळात शिवभाेजन थाळी घरपाेच पार्सल सेवा देण्याची वेळ आता सकाळी १० ते दुपारी १२ व रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत करण्यात आली आहे, तसेच हॉटेल, रेस्टारंट, खानावळ यांनाही या वेळेत पार्सल सेवा देता येणार आहे. त्यामुळे गरजूंना दिलासा मिळणार आहे.