मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे डोक्यावर दगड पडून शेतमजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:23 AM2018-02-20T02:23:54+5:302018-02-20T02:24:16+5:30
हिवरा : विहीर खोदकामादरम्यान डोक्यावर दगड पडून शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे शनिवारी घडली. माळखेड येथील सखाराम नथ्थुबा लंबे (वय ४७) हे स्वत: अल्पभूधारक शेतकरी आहेत. कुटुंबात आई, तीन भाऊ, पत्नी व दोन मुले आहेत. अल्प शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने पूर्ण कुटुंब शेतमजुंरी करते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा : विहीर खोदकामादरम्यान डोक्यावर दगड पडून शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे शनिवारी घडली.
माळखेड येथील सखाराम नथ्थुबा लंबे (वय ४७) हे स्वत: अल्पभूधारक शेतकरी आहेत. कुटुंबात आई, तीन भाऊ, पत्नी व दोन मुले आहेत. अल्प शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने पूर्ण कुटुंब शेतमजुंरी करते.
शनिवारी लव्हाळा येथील एका विहिरीत काम करीत असताना दगड कोसळून तो सखाराम लंबे यांच्या डोक्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत या शेतमजुरास विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.