प्लायवूडखाली दबून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2016 02:19 AM2016-10-14T02:19:07+5:302016-10-14T02:19:07+5:30

ट्रकमधून माल खाली करताना घडली घटना.

The death of a laborer under plywood | प्लायवूडखाली दबून मजुराचा मृत्यू

प्लायवूडखाली दबून मजुराचा मृत्यू

Next

नांदुरा, दि. १३- ट्रकमधून प्लायवूडचा माल खाली उतरवत असताना प्लायवुडच्या शीट खाली दबुन मजूर ठार झाल्याची घटना खामगाव रोडवरील सपना फर्निचर येथे १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. शे.बिस्मील्ला शे.महेबुब असे मृतकाचे नाव आहे.
शहरातील व्यापारी गोवर्धन उर्फ गोटूशेठ मोहनानी यांचे खामगाव नाक्यानजीक फर्निचरच्या दुकानात शे.बिस्मील्ला शे.महेबुब व अन्य १ असे दोघे मजुर ट्रकमधून प्लायवुडचा माल उतरवत होते. हे काम सुरु असताना प्लायवूडच्या शीट अंगावर पडल्याने त्या खाली दबून शे.बिस्मील्ला शे.महेबुब हा इसम ठार झाला. याप्रकरणी श्यामकुमार गोवर्धन मोहनानी यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: The death of a laborer under plywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.