जिगाव प्रकल्पावर काम करत असताना मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 04:53 PM2018-10-15T16:53:25+5:302018-10-15T16:54:23+5:30
जळगाव जामोद : जिगाव प्रकल्पावर काम करणाऱ्या एका मजुराचा दोन टिप्परच्या मध्ये चेंगरून आडोळ जवळ मृत्यू झाल्याची घटना १५ आॅक्टोबररोजी सकाळी दहा वाजता घडली
जळगाव जामोद : जिगाव प्रकल्पावर काम करणाऱ्या एका मजुराचा दोन टिप्परच्या मध्ये चेंगरून आडोळ जवळ मृत्यू झाल्याची घटना १५ आॅक्टोबररोजी सकाळी दहा वाजता घडली.
जिगाव प्रकल्पाच्या ठिकाणी आडोळ येथे काम करीत असताना टिप्पर चालक गोपाल ठाकूर रा. तीमरभिता (जबलपूर) याने त्याच्या ताब्यातील टिपर क्रमांक एम एच १४ एक्स ७२९३ हे भरधाव व निष्काळजीपणे मागे घेतले. या मध्ये जोरात धडक बसल्याने सदर मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी जवानसिंग पवार (वय १८) यांनी दिलेल्या फियार्दीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला टिप्पर चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पाटील हे करीत आहेत. प्रकल्पावर काम करीत असताना गेल्या सहा महिन्यात मजुराचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे.