विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:36 AM2017-07-26T01:36:32+5:302017-07-26T01:37:39+5:30

Death of poisoned virgin marriage | विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

Next
ठळक मुद्देपतिविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या गोपाळ नगरातील ‘त्या’ विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सदर विवाहितेच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी पतीविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे.
चंदा विजय आकोटकर (वय २८) या विवाहितेने सोमवारी विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यामुळे तिला उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताची आई रेखा प्रल्हाद दिघेकर (वय ५०) रा. आकोट यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, मुलगी चंदा हिचा पती विजय हरिभाऊ आकोटकर हा तिला नेहमी मारहाण करून माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावत होता. त्याच्या या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून मुलीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी विजय आकोटकरविरुद्ध कलम ३०६, ४९८ अ, ३२३, ५०४ भादंविनुसार गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे.

Web Title: Death of poisoned virgin marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.