नाल्यात बुडून मनोरुग्ण युवकाचा मृत्यू

By admin | Published: June 18, 2017 07:18 PM2017-06-18T19:18:04+5:302017-06-18T19:18:04+5:30

सैलानीयेथील दर्गा परिसरातील नाल्यात बुडून एका मनोरुग्ण युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना १६ जून रोजी सायंकाळी घडली.

Death of psychiatric youth drowning in the nallah | नाल्यात बुडून मनोरुग्ण युवकाचा मृत्यू

नाल्यात बुडून मनोरुग्ण युवकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सैलानी : सैलानीयेथील दर्गा परिसरातील नाल्यात बुडून एका मनोरुग्ण युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना १६ जून रोजी सायंकाळी घडली.
फारूखअली मोहंमद विक्रमअली असे मृत युवकाचे नाव आहे. निजामाबाद येथील रहिवासी असलेला फारूखअली हा मनोरुग्ण होता. तो भावासोबत येथे उपचारासाठी आला होता. दरम्यान १६ जून रोजी सायंकाळी दग्यापार्सून जवळच असलेल्या नाल्यामध्ये पडून फारूखचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार पोलिस पाटील रामेश्‍वर गवते यांनी पोलिसांत दिली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास एएसआय यशवंत तायडे शेख कय्यूम हे करत आहेत.

Web Title: Death of psychiatric youth drowning in the nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.