अपघातात चिमुकलीचा मृत्यू
By admin | Published: January 26, 2016 02:26 AM2016-01-26T02:26:54+5:302016-01-26T02:26:54+5:30
मोताळा-नांदुरा रस्त्यादरम्यान तरवाडी फाट्याजवळ अपघात.
बुलडाणा : देवाचे दर्शन करून परत येताना अँपे उलटल्यामुळे जखमी झालेल्या ४ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेदरम्यान मोताळा-नांदुरा रस्त्यादरम्यान तरवाडी फाट्याजवळ घडली. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव नाथ येथे एक परिवार अँपेद्वारे मंदिरावर दर्शनासाठी गेला होता. दर्शन झाल्यानंतर परत येत असताना नांदुरा-मोताळादरम्यान असलेल्या तरवाडी फाट्याजवळ अचानक अँपेचे टायर फुटले. त्यामुळे अनियंत्रित झालेला उलटला. त्यात ४ वर्षीय बालिका वृषाली प्रमोद घोरपडे गंभीर जखमी झाली. तिला अत्यवस्थेत उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.