विष प्राशन केलेल्या एसटीच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 10:45 AM2021-11-18T10:45:38+5:302021-11-18T10:48:16+5:30
Death of a technical staff of ST who was consumed poisoned विशाल अंबळकर(२९) रा. माटरगाव ता. शेगाव यांनी बुधवारी रात्री १० वाजता विषारी औषध प्राशन केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव (जि. बुलडाणा): एसटी कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान विष प्राशन केलेल्या विशाल अंबलकर यांचा गुरूवारी रात्री अखेर मृत्यू झाला. विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योम मालवली. त्यांच्या निधनामुळे एसटी कामगारांवर शोककळा पसरली आहे.
एसटी कर्मचाºयांचे राज्यशासनात विलिनीकरण करण्यात यावे, याप्रमुख मागणीसह विविध न्याय मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगारांनी गत १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. या संपादरम्यान, विविध एसटी आगारासमोर परिवारासह आंदोलन केले जात आहे. अशातच संपकरी कामगारांना महामंडळाकडून निलंबित केले जात आहे. त्यामुळे अनेक कर्मचाºयांनी धास्ती घेतली आहे. दरम्यान, खामगाव येथील सहा. मॅकेनिक या पदावरील यांत्रिक कर्मचारी विशाल अंबळकर(२९) रा. माटरगाव ता. शेगाव यांनी बुधवारी रात्री १० वाजता विषारी औषध प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्यांना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यामुळे गुरूवारी रात्री त्यांना तात्काळ अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान अंबळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संपकरी एसटी कर्मचाºयांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे.