दोन कामगारांचा मृत्यू; खामगावातील मस्तान चौकात शोकाकूल वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:58 PM2019-06-12T12:58:25+5:302019-06-12T12:58:33+5:30
दोन कामगारांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. या घटनेमुळे शोकाकूल झालेल्या मुस्लीम बांधवांनी मस्तान चौक परिसरात बंद पाळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : वेल्डींग करत असताना आॅईल टँकचा स्फोट होवून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या दुदैवी घटना ११ जूनरोजी येथील दुर्गाशक्ती फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत संध्याकाळी ६.३० वाजता घडली होती. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. या घटनेमुळे शोकाकूल झालेल्या मुस्लीम बांधवांनी मस्तान चौक परिसरात बंद पाळला.
खामगाव येथील भैय्यूजी महाराज ऋषीसंकूल परिसरात दुुर्गाशक्ती फुडस प्रायव्हेट लिमीटेड कंपनीत आॅईल टँकचा स्फोट होवून त्यामध्ये शेख इसरार उर्फ सलमान शेख अबरार (२८) व शौकत कॉलनीतील शेख मुशिर शेख हनिफ (३०) यांचा मृत्यू झाला. तर फरदीन खान, शेख अमिर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुदैवी घटनेमुळे मस्तान चौकात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. १२ जूनरोजी सकाळपासूनच मस्तान चौकातील एकही दुकान उघडले नाही. व्यापाºयांनी स्वत:हून बंद पाडला.
पोलिस अधिक्षकांनी घेतली भेट
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी खामगाव येथे भेट दिली. मध्यरात्री त्यांनी मुस्लीम समाजातील नेत्यांसोबत बैठक घेवून शांततेचे आवाहन केले.