महिलेचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

By admin | Published: August 26, 2015 11:47 PM2015-08-26T23:47:37+5:302015-08-26T23:47:37+5:30

मेहकर-हिवराआश्रम मार्गावरील ब्रम्हपुरी फाट्याजवळ एका अनोळखी गर्भवती महिलेचे प्रेत आढळले.

The death of the woman, filed a murder case | महिलेचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

महिलेचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

Next

मेहकर (जि. बुलडाणा) : अज्ञात गर्भवती महिलेचे प्रेत आढळल्याचे २५ ऑगस्ट रोजी येथे उघडकीस आले होते. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मेहकर ते हिवराआश्रम रस्त्यावरील ब्रम्हपुरी फाट्याजवळ एका अनोळखी गर्भवती महिलेचे प्रेत २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१५ वाजता आढळून आले. कोणी तरी अज्ञात इसमाने सदर अनोळखी महिलेचा गळा दाबून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ब्रम्हपुरी शिवारात सदर महिलेचे प्रेत आणून टाकले असल्याचा अंदाज तपासाअंती पोलिसांनी लावला. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३0२, २0१ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: The death of the woman, filed a murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.