खामगाव येथे आॅइल मिलममधील मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:33 IST2017-11-28T13:32:02+5:302017-11-28T13:33:38+5:30
खामगाव: आॅइल मिलमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांचा शर्ट मशीनमध्ये अडकून कामगार मशीनमध्ये ओढल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एमआयडीसीमधील भगवती आॅइलमध्ये घडली.

खामगाव येथे आॅइल मिलममधील मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
ठळक मुद्देमशीनमध्ये शर्ट अडकल्याने ओढल्या गेला ही दुर्दैवी घटना एमआयडीसीमधील भगवती आॅइलमध्ये घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: आॅइल मिलमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांचा शर्ट मशीनमध्ये अडकून कामगार मशीनमध्ये ओढल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एमआयडीसीमधील भगवती आॅइलमध्ये घडली.
बाबाराव यशवंतजी डुकरे (वय ५८) रा. सुटाळा बु. हे येथील औद्योगिक वसाहतीमधील भगवती आॅइल मिलमध्ये कार्यरत आहे. रविवारी ते कव्हर मशीनजवळ काम करीत असताना त्यांचा शर्ट मशीनच्या चैनमध्ये अडकून ते मशीनमध्ये ओढल्या गेले. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.