विजेचा धक्क्याने तरूण शेतक-याचा मृत्यू

By admin | Published: June 18, 2017 07:15 PM2017-06-18T19:15:44+5:302017-06-18T19:39:26+5:30

विजेच्या जीवंत तारेला धक्का लागल्याने शारा येथील ज्ञानेश्‍वर उद्धव लहाने (३0) या शेतक-याचा मृत्यू झाला.

Death of young farmers by electric shock | विजेचा धक्क्याने तरूण शेतक-याचा मृत्यू

विजेचा धक्क्याने तरूण शेतक-याचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शारा (जि. बुलडाणा) : वडगाव तेजन शिवारातील शेतात पेरणी करीत असताना शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या जीवंत तारेला धक्का लागल्याने शारा येथील ज्ञानेश्‍वर उद्धव लहाने (३0) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. ही घटना १८ जून रोजी दुपारी दोन वाजता घडली.
ज्ञानेश्‍वर उद्धव लहाने यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. वडगाव तेजन शिवारात अंदाजे दीड एकर असलेल्या शेतावरच त्यांच्या कुंटूबाचे उदरनिर्वाह चालवीत होते. शेतात पेरणी करण्यासाठी शेजारील शेतकर्‍यांचे बैल व इतर शेतीचे साहित्य आणून पेरणीचे कामे करीत होते.
लोणार तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा करणारे खांब वाकले असून ते पडण्याच्या स्थितीत आहेत. वीज खांब वाकलेल्या आणि तुटण्याच्या स्थितीत आहेत, तर त्यावरील वीज वाहक तारा लोंबकळत असल्याने त्याबाबत शेतकरी वारंवार तक्रारी करत असताना त्याकडे जाणून बुजून वीज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.

रोहित्र शारा शिवारात येत असल्याने माझ्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. सदर शेतकर्‍याने लोणार येथील कार्यालयात तक्रारी दिलेल्या आहेत.
-डी.बी.साळवे, वायरमन.

लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा दुरुस्ती करण्यात याव्या यासंदर्भात लोणार येथील वीज वितरण कार्यालयात वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत. मात्र पैशांची मागणी पूर्ण झाल्यामुळे संबधित अधिकार्‍यांनी कामे करण्यासाठी टाळाटाळा केलेली आहे.
-अरविंद कुमार डव्हळे, शेतकरी , शारा

Web Title: Death of young farmers by electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.