‘कर्जमुक्ती’च्या पैसे वळतीचा प्रयोग साखळी, सुनगावमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 02:50 PM2020-02-22T14:50:04+5:302020-02-22T14:50:13+5:30
कर्जमुक्तीचे पैसे त्यांच्या खात्यात वळती करण्याचा पायलट प्रोजेक्ट २४ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची माहिती पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर आता प्रायोगिक तत्वावर साखळी बुद्रूक आणि सुनगाव या दोन गावांतील शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे पैसे त्यांच्या खात्यात वळती करण्याचा पायलट प्रोजेक्ट २४ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहे. गाव पातळीवर कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर गोंधळ उडण्याची शक्यता पाहता प्रथमत: हा प्रयोग करण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकºयांना एक हजार ४०० कोटी रुपयांच्या आसपास कर्जमाफी होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा मधल्या काळात सक्रीया होती. कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकºयांच्या कर्जखात्याची व आधार क्रमांकाची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. ‘आधार’ बेस असलेल्या या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रथमत: राज्यातील ३४ जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गावात प्रायोगिक तत्वावर कर्जमाफीची रक्कम वळती करण्याचा प्रयोग २४ फेब्रुवारी रोजी करण्यात येत आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील साखळी बुद्रूक आणि जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही गावातील कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची यादी गाव पातळीवर प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधीत बँकांचे अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा गावात पोहोचून योजनेचा महत्त्वाचा टप्पा असलेला ‘कर्जमाफी आॅथेंटीकेशन’चा टप्पा पारपाडणार आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेनेही यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, दोन गावातील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी गावपातळीवर कर्जमाफी झालेल्या शेतकºयांच्या याद्या झळकणार आहेत.
दरम्यान जिल्हा बँकेनेच्याही १०५ कर्जदार शेतकºयांची यातंर्गत कर्जमाफी होणार असून साखळी खुर्द येथे जिल्हा बँकेचे दोन अधिकारी जाणार असून १९ शेतकºयांचे आॅथेंटीकेशन करून त्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळती करण्याचा प्रयोग करतील. सुनगाव येथे जिल्हा बँकेची शाखाच असून तेथे ८४ जणांचा यात समावेश आहे.
शेतकºयांनी काय करावे?
गावात यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांनी त्यांचा आधार कार्ड क्रमांक बरोबर आहे? कर्जमाफीची रक्कम बरोबर आहे का? याची पडताळणी करून आपले सेवा केंद्रावर जावून बायोमॅट्रीक पद्धतीने आॅथेंटीकेशन द्यावयाचे आहे. आधार क्रमांक किंवा कर्जाची रक्कम चुकीची असल्यास आॅथेंटीकेशन देतांना त्यानुषंगाने नकारात्मक पर्याय निवडावा. माहिती चुकीची असल्यास त्याच वेळी संबधीत शेतकºयाची आॅनलाईन तक्रार स्वयंचतील पद्धतीने बनून जिल्हास्तरीय समितीकडे ही आपसूकच पोहोचेल. प्रसंगी तालुकास्तरावर आॅफलाईन पद्धतीने ती देता येईल.
आॅथेंटीकेशनसाठी आहेत तीन पर्याय
कर्जाची रक्कम, आधार क्रमांक योग्य असल्यास आॅथेंटीकेशन दिल्यानंतर शेतकºयाच्या कर्जखात्यात कर्जमुक्तीचे पैसे पडतली. आथेंटीकेशनसाठी प्रशासनाने तीन पर्याय उपलब्ध केलेले आहेत. यामध्ये बायोमेट्रीक पद्धतीने, रजीस्टर केलेल्या मोबाईलवर ओटीपी (वन टाईम पासर्वड) आणि अत्यंत अडचणीच्या वेळी राशन दुकानात उपलब्ध असलेल्या पॉसमशीनच्या माध्यमातून आॅथेंटीकेशन होईल.
जिल्हा बँकेची टेस्टींग यशस्वी
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या ५३ शाखांमधील बायोमेट्रीक मशीनची राज्य शासनाच्या कर्जमुक्ती पोर्टलशी लिंकींग करून त्यांची चाचणीही यशस्वी करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी रोजी त्यादृष्टीने जिल्हा बँकेच्या आयटी सेलने चाचणी करून ती यशस्वी केली असल्याची माहीती जिल्हा बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात यांनी दिली.