कर्जबाजारी शेतकरी पुत्राची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:53 AM2017-08-26T00:53:33+5:302017-08-26T00:53:54+5:30

पिंपळगाव सैलानी: बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील  कर्जबाजारी शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना २४ ऑगस्ट रोजी रात्री घडली.

Debt-induced farmer's son suicides | कर्जबाजारी शेतकरी पुत्राची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकरी पुत्राची आत्महत्या

Next
ठळक मुद्देपळसखेड भट येथील घटनाशेतकरी पुत्राने गळफास संपविली जीवनयात्रा

पिंपळगाव सैलानी: बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील  कर्जबाजारी शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना २४ ऑगस्ट रोजी रात्री घडली. पळसखेड भट येथील शे तकरी दशरथ मांडोगडे यांच्याकडे सेंट्रल बँकेचे ५0 हजार रुपये  कर्ज तसेच १ लाख रुपयांचे गावातील उसनवारी कर्ज आहे. शे तामध्ये सततची नापिकी असल्यामुळे घरामध्ये वारंवार कर्जापायी  वाद होत होते. या आर्थिक परिस्थितीपुढे हतबल होऊन शेतकरी  पुत्र गजानन दशरथ मांडोगडे (वय २८) याने घरात कोणी नसताना  ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी किसन  मांडोगडे यांनी रायपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. यावरून  ठाणेदार जे.एन. सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मो.  सोफीयान, शेख कय्युम यांनी घटनास्थळी जाऊन मृतकाचा  पंचनामा केला. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा  असा परिवार असून, सदर कुटुंब गरीब  आहे.

Web Title: Debt-induced farmer's son suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.