शेतकर्यांना १८ ऑक्टोबरपासून मिळणार कर्जमाफीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:59 AM2017-10-17T00:59:29+5:302017-10-17T00:59:59+5:30
बुलडाणा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान या योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज पूर्णपणे तर दीड लाखावरील कर्ज एकरकमी पद्धतीने मिळणार आहे. यामध्ये शेतकर्यांकडून ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर, अर्जांची छाननी व लेखा परीक्षण पूर्ण करण्यात आले. ऑडिट केलेल्या अर्जांच्या फाईली शासनाकडे सादर करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. राज्यात १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची र क्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये दीड लाखापर्यंत कर्ज माफ झालेल्या शेतकर्यांना थेट मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे कर्ज बेबाक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जिल्ह्यात मुदतीपर्यंत कर्जमाफीचे ऑनलाइन ४ लाख ६७ हजार ४७५ शेतकर्यांनी नोंदणी करण्यात आली. कुटुंब व्या ख्येत २ लाख ५0 हजार ७४५ कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहे. त्यानुसार दीड लक्ष रुपयांपर्यंत कर्ज माफ झालेल्या प्रत्येक तालुक्यातील शेतकर्यांना प्रतिनिधीक स्वरूपात कर्ज बेबाक प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असून, या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रम १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात शेतकरी कुटुंबाचा सन्मान करण्यात येणार असून, मु ख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. तसेच मुंबईत प्रत्येक जिल्ह्यातील दोन शेतकरी कुटुंबाना आमंत्रित करून मुख्य कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.