बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:12 PM2018-07-27T18:12:03+5:302018-07-27T18:14:06+5:30

बुलडाणा : वर्षपूर्तीनंतरही शेतकरी कर्जमाफीचे गुर्हाळ सुरूच असून २७ जुलै २०१८ पर्यंतच्या तारखेत जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार ४४८ शेतकऱ्यांना ९५० कोटी ६८ लाख ३३ हजार रुपयांची कर्जमाफी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Debt waiver of 1,85,000 farmers in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

Next
ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी प्रारंभी दोन लाख ५० हजार शेतकरी कुटूंब पात्र ठरले होते. प्रत्यक्षात एक लाख ५९ हजार ८३२ शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली होती.

 

- नीलेश जोशी

बुलडाणा : वर्षपूर्तीनंतरही शेतकरी कर्जमाफीचे गुर्हाळ सुरूच असून २७ जुलै २०१८ पर्यंतच्या तारखेत जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार ४४८ शेतकऱ्यांना ९५० कोटी ६८ लाख ३३ हजार रुपयांची कर्जमाफी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आतापर्यंत आठ ग्रीनलिस्ट आल्या असून, नवव्या ग्रीन लिस्टमध्ये जवळपास २६ हजार ६१६ शेतकऱ्यांना ९८ कोटी ८९ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाल्याचा अंदाज असून त्यामुळे पूर्वीच्या ८५१ कोटी ७९ लाख रुपयांच्या कर्जमाफीच्या रकमेत वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी प्रारंभी दोन लाख ५० हजार शेतकरी कुटूंब पात्र ठरले होते. त्यांच्या कर्जमाफीसाठी एक हजार ४०० कोटी रुपयांची गरज होती. आठ डिसेंबर २०१७ पर्यंत प्रत्यक्षात जिल्ह्यात ५९ हजार २०२ शेतकर्यांना कर्जमाफी मिळून त्यापोटी २६८ कोटी ७१ लाख रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले होते. दरम्यान, त्यानंतर सातत्याने हा आकडा वाढत जाऊन मधल्या काळात तो ८५१ कोटी ७९ लाख रुपयांच्या घरात गेला होता तर प्रत्यक्षात एक लाख ५९ हजार ८३२ शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली होती. मात्र यातील प्रोत्साहनपर अनुदान, वनटाईम सेटलमेंटच्या कार्यवाहीत कर्जमाफीची प्रक्रिया रेंगाळत गेली. त्यातच जिल्ह्यातील जवळपास ३० हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांचा डाटाच अपडेट नसल्याने त्यांची प्रकरणे ही तालुकास्तरीय समितीच्या कोर्टात(टीेलसी) फेब्रुवारी २०१८ दरम्यान गेली होती. त्यात सातत्याने वाढ होत गेली आहे. या शेतकर्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा टीएलसी त्याबाबत काय निर्णय देते यावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ६९१ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेणार्या एक लाख २३ हजार ८१६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तर अ‍ॅक्सीस, एचडीएफसी, आयसीआयसी या खासगी बँकांकडून ५३२ शेतकऱ्यांनी घेतलेले ९ कोटी ८१ लाख चार हजार रुपयांचे कर्जही माफ झाले आहे. दरम्यान, ग्रामीण बँकांकडून कर्ज घेतलेल्या २७ हजार ८८ शेतकऱ्यां ना ९० कोटी ९८ लाख ६३ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या ३४ हजार १२ शेतकर्यांनाही १५८ कोटी ५९ लाख १६ हजार हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.

प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम प्रलंबीत

प्रोत्साहनपर अनुदानापोटी शेतकर्यांना २५ कोटी ८१ लाख ९० हजार रुपयां मिळाले आहेत. मात्र प्रत्यक्षात ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे १६ कोटी ६२ लाख, खासगी बँकांकडे सात कोटी ७४ लाख तर ग्रामीण बँकांकडे एक कोटी ७१ लाख रुपयांचे हे शेतकर्यांचे प्रोत्साहनपर अनुदान आहे. तेही वेळेत शेतकऱ्यांना मिळावे अशी ओरड आता होत आहे. ३१ जुलै २०१७ पर्यंत कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना २०१५-१६ या वर्षातील कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपैकी जी रक्कम कमी असले ती यातंर्गत अनुदानस्वरुपात शेतकर्यांना देण्यात येत आहे. १५ हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम असल्यास अशी संपूर्ण रक्कम शेतकर्यांना परत देण्यात येणार आहे.

सहा हजार शेतकऱ्यांची कर्ज माफी प्रक्रियेत

याशिवाय जिल्ह्यातील सहा हजार ६३१ शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या अर्ज प्रलंबीत असून कर्जमाफीसंदर्भातील त्यांची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ती पूर्णत्वास जाईल, असेही सुत्रांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे पाच हजार ३६९ तर ग्रामीण बँकांकडे ८०० सध्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत आले आहेत.

Web Title: Debt waiver of 1,85,000 farmers in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.