सोन्याची नाणी देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक; जनुना शिवारातील घटना, दोघांविरोधात गुन्हा दाखल
By अनिल गवई | Published: December 24, 2023 12:31 PM2023-12-24T12:31:47+5:302023-12-24T12:32:16+5:30
नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेल्या एका ३० वर्षीय युवकाला नकली सोन्याची नाणी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आली.
खामगाव: नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेल्या एका ३० वर्षीय युवकाला नकली सोन्याची नाणी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आली. ही घटना शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जनुना शिवारात शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीसांनी दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, रत्नागिरी येथील अाकाश नारायण श्रीनाथ हा युवक नातेवाईकाच्या लग्नासाठी २० डिसेंबर रोजी खामगावात आला होता. दरम्यान, खामगाव येथील बसस्थानकावर उभा असताना एका युवकाने त्याच्याशी संपर्क कमी िकंमतीत सोन्याची नाणी देण्याचे आमिष देत, एक खरे नाणे त्याला दाखविले. युवकाने दिलेले नाणे खरे असल्याची खात्री पटल्यानंतर इतर नाणी देण्याचाही सौदा झाला. त्यावेळी नाव, गाव आणि पत्ता विचारल्यानंतर आरोपीने श्रीनाथ यांच्या मोबाईलवर २२ िडसेंबर रोजी संपर्क साधला. तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर तुम्ही उंद्री या गावी भेटावयास बोलावले. त्यावेळी उंद्री येथे जाण्यास नकार दिल्याने खामगाव जवळील जळका तेली रोडवर भेट घेण्याचे ठरले.
आरोपीयुवक आणि त्याच्या साथीदाराने श्रीनाथ याला दिलेली सोन्याचे नाणे दाखवून परत घेतले व त्याच्याकडील पांढऱ्या प्लास्टिक थैलीमध्ये पिवळा रंग असलेल्या धातूच्या गिन्या अंदाजे अर्धा किलो ग्राम वजनाच्या फिर्यादीकडे दिल्या.आताच येथे चेक करून घ्या व पैशांची मागणी केली. त्यावेळी नाणी खामगावात तपासणी करण्याचे ठरल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान, पिवळ्या धातूची नाणी नकली निघाल्याने ॲडव्हास म्हणून दिलेली रक्कम परत मागण्यासाठी व्यवहारासाठी आलेल्या क्रमांकावर संपर्क केला असता, संबंधित नंबर बंद आला. त्यामुळे आपली पॐसवणूक झाल्याचे श्रीनाथ यांनी तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीसांनी एका अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय खांबलकर करीत आहे.