सैलानी यात्रेतील मनोरंजनावर आज होणार फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:18 AM2018-02-20T02:18:48+5:302018-02-20T02:18:59+5:30
पिंळगाव सैलानी: मनोरंजनाच्या साधनावर बंदी घालण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या निर्णयानंतर सैलानी यात्रेच्या अंतिम नियोजनाची बैठक थेट सैलानी येथेच जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बोलावली असून, या मुद्दय़ावर अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

तब्बल ११६ वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेच्या नियोजनाची ही अंतिम बैठक असल्याने तिला महत्त्व प्राप्त झाले आहे. मनोरजंनाच्या साधनावर बंदी घातल्याने या यात्रेतून जिल्हय़ाला मिळणार्या कराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकार्यांच्या निर्णयालाही विरोध होत आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही यासंदर्भात एक निवेदन देण्यात आलेले आहे. आता थेट सैलानीतच बैठक होत असल्याने संपूर्ण राज्याच्या नजरा या बैठकीकडे लागलेल्या आहेत. आ. राहुल बोंद्रे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. बैठकीनंतर जिल्हाधिकारी प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करणार आहेत.